जालन्यात बेकायदेशिर ऑनलाईन लॉटरीच्या 8 ठिकाणावर एकाच वेळी छापे, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

जालना शहरात बेकायदेशिररित्या ऑनलाईन लॉटरीच्या आठ ठिकाणावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकाचवेळी छापे मारून तब्बल 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे ऑनलाईन लॉटरीच्या चालकांत चांगलीच घबराट सुटली आहे.

जालना शहरातील टांगा स्टॅन्ड, गरीबशहा बाजार, कडबीमंडी, रामनगर, मुथा बिल्डींग, सुभाष चौक, बसस्थानक या भागात आरोपी संजय रामचंद्र परिवाले हा या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने बेकायदेशिररित्या ऑनलाईन लॉटरी सेंटर चालू करुन लोकांना जास्त पैशाचे आमिष दाखवून ऑनलाईन लॉटरी आकड्यावर पैसे लावून लोकांची फसवणुक करीत होता. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. त्यावरुन आज 26 सप्टेंबर रोजी परी. पोलीस अधिक्षक गौहर हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी बेकायदेशिर ऑनलाईन लॉटरी सेंटरवर कार्यवाही करण्यासाठी वेगवेगळे 7 पथके तयार केली. पथकातील अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन करुन स्वतः पथकासह कबडी मंडी येथे श्रीराम ऑनलाईन लॉटरी व चेतन ऑनलाईन लॉटरी सेंटरवर छापा मारला. पोलिसांनी एकूण कारवाईत जवळपास 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना ताब्यात घेतले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या