वर्षा उसगावकर आणि अमितराज ‘जळू’च्या निमित्ताने पुन्हा एकत्र

70

सामना ऑनलाईन । मुंबई

‘साई नक्षत्र प्रोडक्शन’ निर्मित आगामी ‘जळू’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला. यावेळी अभिनेत्री वर्षा उसगावकर, रश्मी राजपूत, अभिनेते कमलेश सावंत, संगीत दिग्दर्शक अमितराज उपस्थित होते. हा चित्रपट स्त्री सक्षमीकरणावर भाष्य करणारा असून या चित्रपटाच्या निमित्ताने चार वर्षांनंतर अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि संगीत दिग्दर्शक अमितराज पुन्हा एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी या दोघांनीही २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दुनियादारी’ या चित्रपटात एकत्रित काम केलं आहे.

निर्माते अजितकुमार धुळे आणि श्रीनिवास बिहाणी यांच्या ‘साई नक्षत्र प्रोडक्शन’ निर्मित ‘जळू’ चित्रपटाची कथा अजितकुमार धुळे आणि सागिरा पटेल यांची असून पटकथा तेजस तुंगार यांनी लिहिली आहे. सी.आय.डी, आहट, मधली सुट्टी, कॉमेडी एक्सप्रेस यांसारख्या मालिकांचे संकलक निखिल भोसले यांच्या सोबत अजित कुमार धुळे दिग्दर्शनाची जबाबदारी पार पडणार आहेत. चित्रपटातील गीते अजितकुमार धुळे, किशोर गागरे, किरण डोंगर दिवे, महेश ससाणे यांनी लिहिली असून नितीन चांदोरकर हे कार्यकारी निर्मिता म्हणून जबाबदारी पार पडणार आहेत. चित्रपटातील सर्व गाणी संगीत दिग्दर्शक अमितराज संगीतबद्ध करणार असून, नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर त्याचे नृत्यदिग्दर्शन करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या