जलयुक्त शिवार बंद नाही

61

जलयुक्त शिवार योजनेचे 2018-19 हे शेवटचे वर्ष होते. शासनाने या योजनेस गेल्या 31 डिसेंबरअखेर मुदतवाढ दिली. त्यामुळे जिह्यात जलयुक्त शिवार योजना बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचा निर्वाळा मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिला आहे.

जलयुक्त शिवार योजनेला मुदतवाढ न देता ही योजना बंद करण्यात आली आहे का? असा तारांकित प्रश्न शेकापचे जयंत पाटील यांनी विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना गडाख यांनी जलयुक्त शिवार हे अभियान राबवण्याची मुदत 31 मार्च 2019 पर्यंत होती. त्यानंतरदेखील योजनेला राज्य सरकारने 31 डिसेंबर 2019 पर्यंतच मुदतवाढ दिली होती. त्यामुळे ही योजना बंद करण्याचा प्रश्नच नाही असे स्पष्ट केले.

पाच वर्षांत 9 हजार 707 कोटी रुपये खर्च

जलयुक्त शिवारच्या माध्यमातून 2015 ते 2019 या काळात 22 हजार 586 गावे निवडण्यात आली, या गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत एकूण 6 लाख 32 हजार 708 कामं पूर्ण करण्यात आली या कामांवर आतापर्यंत 9 हजार 707 कोटी रुपये खर्च झाल्याचं त्यांनी सांगितलं.

आपली प्रतिक्रिया द्या