अँडरसन @५००! ताज्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप

41

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लॉर्डस कसोटीमध्ये इंग्लंडच्या विजायाच्या हिरो राहिलेल्या वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. लॉर्डस कसोटीमध्ये अँडरसनने पहिल्या डावात २, तर दुसऱ्या डावात ७ गडी बाद केले होते. कसोटीमधील एका डावातील ही अँडरसनची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यामुळे इंग्लंडने विंडिजविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ असा विजय मिळवला आहे.

लॉर्डस कसोटीमध्ये अँडरसनने ९ बळी घेत ५०० बळींचा टप्पा पार केला आहे. ३५ वर्षांचा अँडरसन कसोटीमध्ये ५०० बळी घेणारा सहावा गोलंदाज आहे. या कामगिरीच्या जोरावर अँडरसनने पहिल्या स्थानावर असलेल्या रविंद्र जाडेजाला मागे सारले आहे. रविंद्र जाडेजाची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. पहिल्या स्थानावरील अँडरसनचे ८९६ अंक आहेत, तर दुसऱ्या स्थानावरील रविंद्र जाडेजाचे ८८४ अंक आहेत.

अँडरसनने आतापर्यंत १२९ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने २००३ साली झिम्बाब्वेविरुद्ध कसोटीमध्ये पदार्पण केले होते. कसोटीमध्ये १२९ सामन्यात अँडरसनने २७.३९ च्या सरासरीने ५०६ बळी घेतले आहेत. एकाच डावात ५ बळी घेण्याची किमया अँडरसनने २४ वेळा केली आहे, तर तीन वेळा एकाच कसोटीमध्ये १० पेक्षा अधिक बळी मिळवले आहेत.

कसोटी सर्धाधिक बळी घेणारे गोलंदाज
१) मुथय्या मुरलीधरन – ८०० बळी
२) शेन वॉर्न – ७०८ बळी
३) अनिल कुंबळे – ६१९ बळी
४) ग्लेन मॅग्राथ – ५६३ बळी
५) कर्टनी वॉल्श – ५१९ बळी
६) जेम्स अँडरसन – ५०६ बळी

आपली प्रतिक्रिया द्या