भर मैदानात दिली शिवी, वेगवान गोलंदाज पहिल्या कसोटीला मुकणार

1375

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सन याने भर मैदानात शिवी दिल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पॅटिन्सनवर एका सामन्याच्या बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध याच आठवड्यात सुरू होणाऱ्या कसोटी लढतीसाठी तो मैदानात उतरू शकणार नाही.

गेल्या आठवड्यामध्ये व्हिक्टोरिया क्विन्सलँडविरुद्ध झालेल्या सामन्यात जेम्स पॅटिन्सन याने विरोधी संघाच्या खेळाडूला मैदानातच शिवीगाळ केली होती. पॅटिन्सन ऑस्ट्रेलियाच्या आचार संहिता उल्लंघनामध्ये दोषी आढळला. यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्यावर एका सामन्याची बंदी घातली.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख अधिकाऱ्यांपैकी एक सीन कॅरोल यांनी सांगितले की, खेळ भावना कायम राखण्यासाठी आणि तत्वांचे पालन होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत व त्याच अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. पॅटिन्सनने या प्रकरणी माफीही मागितल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पॅटिन्सनवरील कारवाईमुळे गुरुवारपासून पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी लढतीला तो मुकणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या