जामिया ईस्लामई मदरशात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

1048

अमरावतीतील लालखडी येथील जामिया ईस्लामईच्या बुस्तान-ए-फातेमा लिलबन नामक मदरशात एका 15 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणात नागपुरी गेट पोलिसांनी मदरशाचे प्रमुख मुक्ती जिया उल्ला याला अटक केली आहे. या संदर्भात नागपुरी गेट पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार 3 नोव्हेंबर पूर्वी मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती.

या संदर्भात पिडीत बालिकेच्या नातेवाईकांनी 3 ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केल्यानंतर मदरशाचा प्रमुख मुक्ती जिया उल्ला फरार झाला होता. त्याला काल (दि.6) नागपूर येथून अटक करण्यात आली आहे. दरम्यान मदरशाची पोलिसांनी झाडाझडती घेतली. मुक्ती जिया उल्ला या नराधमाला मदत करणारी एका शिक्षिका अद्याप फरार आहे. या अत्याचाराच्या घटनेमुळे मुस्लीम समाजात तीव्र असंतोष पसरला असून मदशात झालेल्या अत्याचारामुळे या ठिकाणी सुद्धा लहान मुले मुली सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेनंतर नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मुस्लीम बहुल परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या