जामिया हिंसाचाराचा आणखी एक व्हिडीओ जारी, हातात दगड घेतलेले आंदोलनकर्ते दिसले

683

रविवारी जामिया समन्वय समितीने एक व्हिडीओ जारी केला होता. त्यात सीआरपीएफचे जवान जामियाच्या विद्यार्थ्यांना मारहाण करताना दिसत होते. आता या घटनेचा अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात काही आंदोलक दगड घेऊन लायब्ररीमध्ये घुसताना दिसत आहेत. त्यामुळे या घटनेला वेगळेच वळण लागले आहे.


रविवारी जामिया समन्वय समितीने व्हिडीओ जारी केल्यानंतर दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफवर चौफेर टीका झाली. त्यानंतर मारहाणीपूर्वीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात अनेक आंदोलनकर्ते लायब्ररीमध्ये घुसले आहेत. त्यात अनेक मास्क लावलेले असून काही आंदोलनकर्त्यांच्या हातात दगडही दिसत आहेत.

असे असले तरी हे व्हिडीओ विद्यापीठाने जारी केले नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे. तसेच जामिया समन्वय समितीचा आणि जामिया मिलिया मुस्लिम विद्यापीठाचाही काहीच संबंध नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या व्हिडीओमुळे पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आले आहे. या प्रकरणी अजून तपास सुरू आहे अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या