पाकड्यांच्या गोळीबारात हेड कॉन्स्टेबल हाजरा शहीद, जन्मदिनी देशासाठी बलिदान

सामना ऑनलाईन । श्रीनगर

पाकिस्तानने आज (बुधवारी) सांबा सेक्टर येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन गोळीबार केला. पाकड्यांच्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) हेड कॉन्स्टेबल असलेले आर. पी. हाजरा (५१ वर्षे) शहीद झाले. हाजरा यांचा आजच वाढदिवस होता. जन्मदिनी त्यांनी देशासाठी बलिदान दिले.

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादचे रहिवासी असलेले हाजरा पाकड्यांचा गोळीबारात जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिथेच उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा, मुलगी असा परिवार आहे. हाजरा यांचा मुलगा १८ वर्षांचा असून मुलगी २१ वर्षांची आहे.

मागील १२ महिन्यात पाकिस्तानने ९००पेक्षा जास्त वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन गोळीबार केला आहे. याआधी २३ डिसेंबर रोजी केरी सेक्टर येथे पाकड्यांनी केलेल्या गोळीबारात भंडाऱ्याचे सुपुत्र मेजर प्रफुल्ल मोहरकर आणि आणखी ३ जवान शहीद झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या