कश्मीरमध्ये बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडला

9

सामना ऑनलाईन । श्रीनगर

कश्मीरमध्ये हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेतील बेपत्ता झालेल्या जवानांपैकी एका जवानाचा मृतदेह सापडला आहे. कौशल कुमार सिंह असे या सैनिकांचे नाव असून तो सांबा परिसरात राहणारा आहे. ११ डिसेंबरला कश्मीरमधील नौगाम व गुरेझ या दोन परिसरात हिमकडा कोसळून अपघात झाला होता.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कश्मीर नौगाम भागात ११ डिसेंबरला संध्याकाळी पाचच्या सुमारास हिमकडा कोसळून जवान बेपत्ता झाले होते. या भागात बचाव कार्यास सुरू असून कौशल सिंह यांचा मृतदेह सापडला आहे. अद्याप काही जवान बेपत्ता असून बर्फवृष्टीमुळे बचाव कार्यात अडथळा येत आहे, असेही ते म्हणाले.

हिमकडा कोसळून हिंदुस्थानची चौकी उध्वस्त, सहा जवान बेपत्ता

तसेच गुरेझ सेक्टरमध्येही दहा जवान नियंत्रण रेषेजवळ पहारा देत असताना वातावरण खराब झाल्याने जवान घसरून खाली पडले. त्यानंतर लगेचच बचाव कार्याला सुरूवात करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या