जम्मू–कश्मीर हिंदुस्थानचेच! 72 वर्षांनंतर पाकिस्तानची कबुली

1295

जम्मू-कश्मीरवरून थयथयाट करणाऱ्या पाकिस्तानला त्यांच्या परराष्ट्रमंत्र्याने सुनावले आहे. जम्मू-कश्मीर हा हिंदुस्थानचेच आहे, अशी स्पष्ट कबुली परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेत (यूएनएचआरसी) दिली आहे. तब्बल 72 वर्षांनंतर जगासमोर पाकने ही कबुली दिली आहे.

jammu-kashmir-shikara

जिनिव्हा येथे 72 वी ‘यूएनएचआरसी’ परिषद सुरू आहे. या परिषदेत बोलताना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी जम्मू-कश्मीरातून 370 कलम हटविल्यामुळे मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे असे रडगाणे गायले. कश्मीर खोऱ्यात हिंदुस्थानकडून मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे, असा धादांत खोटा आरोप करून संयुक्त राष्ट्रसंघाने संयुक्त चौकशी समिती स्थापन करावी अशी मागणीही त्यांनी केली, मात्र यावेळी त्यांनी स्पष्टपणे कबुली दिली की, जम्मू-कश्मीर हे हिंदुस्थानचेच राज्य आहे. ‘युनो’च्या व्यासपीठावर पाकने पहिल्यांदा ही कबुली दिल्यामुळे हिंदुस्थानची बाजू भक्कम झाली आहे.  दरम्यान, ‘यूएनएचआरसी’प्रमुख मिशेल बाशालेट यांनी कश्मीरमधील मानवाधिकाराबाबत आपण चिंतेत आहोत असे सोमवारी म्हटले होते.

jammu-kashmir-kids-playing

अहवालात राहुल गांधी, ओमर यांचा उल्लेख

पाकिस्तानने ‘यूएनएचआरसी’पुढे 115 पानी अहवाल सादर केला. यामध्ये 370 कलम हटविल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. या टीकेचा समावेश अहवालात पाकने केला आहे. तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी 370 कलम हटविणे बेकायदेशीर, असंविधानात्मक आणि धक्कादायक म्हटले होते. याचाही समावेश या अहवालात आहे. हिंदुस्थानविरुद्ध प्रस्ताव आणण्याची खेळी पाकिस्तान करीत आहे.

jammu-kashmir-soldier-good

पाकच्या रडगाण्याला चीनची साथ

कश्मीर खोऱ्यात मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे रडगाणे पाकिस्तानने गायले. यावेळी चीनने पाकला साथ दिली. पाकिस्तान-चीनने याबाबत संयुक्त निवेदन ‘यूएनएचआरसी’ पुढे सादर केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या