जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात आणखी दोन जवान शहीद

जम्मू-कश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराने केलेल्या शस्त्रसंधीचे उल्लंघनात दोन दोन जवान शहीद झाले आहेत. गेल्या 24 तासात जम्मू-काश्मीरमध्ये चार जवान शहीद झाले आहेत.

सुंदर बनी सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने अंदाधुंद गोळीबार करत मोर्टार डागले. या हल्ल्यात नाईक प्रेम बहादुर खत्री व रायफल मॅन सुखबीर सिंग हे गंभीर जखमी झाले होते. या दोन्ही जवानांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी देखील जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर शहरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते यातील एक जवान हा महाराष्ट्रातील अवघ्या वीस वर्षाचा यश देशमुख एक होता.

सहा ऑक्टोबर पर्यंत पाकिस्तान कडून 3589 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. सर्वात जास्त शस्त्रसंधीचे उल्लंघन 427 वेळा सप्टेंबर महिन्यात झाले तर त्याआधी मार्च महिन्यात 411 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. ऑगस्ट महिन्यात 408 वेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधी मोडण्यात आली. पाकिस्तान कडून सतत होणाऱ्या गोळीबारमुळे हिंदुस्तानी दुतावसाकडून पाकिस्तानी उच्चायुक्तांना समन्स बजावण्यात आले आहे

आपली प्रतिक्रिया द्या