मायावती बौद्ध धर्म स्वीकारणार

914

केंद्र सरकारने जम्मू कश्मीरमधील 370 कलम हटविण्याला आमचा पाठिंबा आहे पण हिंदू राष्ट्र आम्हाला मान्य नाही असे बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी ठामपणे सांगितले. नागपूरमध्ये आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांनी हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र असल्याचे एका कार्यक्रमात म्हटले होते. तसेच हिंदुस्थान धर्मनिरपेक्ष असून येथे मुस्लिम समाज सर्वाधिक सुखी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाज सुखी असल्याचे केवळ दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याला आम्ही कधीच समर्थन देणार नाही. तसेच सरसंघचालकांनी सच्चर कमिटीच्या अहवालाचा अभ्यास करण्याचा सल्लाही मायावती यांनी यावेळी दिला. सभेत मायावती यांनी रा. स्व. संघ आणि भाजपावर कडाडून हल्ला चढविला. काँग्रेसचाही मायावतींनी समाचार घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान केवळ हिंदूंना डोळ्यांसमोर ठेवून लिहिले नव्हते. सर्व जाती, धर्म, पंथाचे लोक त्यांना अपेक्षित होत. बाबासाहेबांना देशाची एकता आणि अखंडता हवी होती. त्यामुळेच आम्ही जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटविण्यास पाठिंबा दिला, पण म्हणून सरकारच्या कोणत्याही चुकीच्या गोष्टीचे आम्ही अजितबात समर्थन करणार नसल्याचे मायावती यांनी ठणकावून सांगितले.

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढली

काँगेस व भाजपवर सडाडून टीका करताना मायावती म्हणाल्या की, काँगेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सरकारच्या चुकीचे धोरण आणि कार्यपद्धतीमुळे संपूर्ण देशात गरिबी, बेरोजगारी, महागाई वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला या समस्येला जावे लागत आहे. सरकारने आर्थिक मंदी दूर करायला हवी अशी मागणी मायावती यांनी यावेळी केली. यावेळी त्यांनी गरिबी आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना आखल्या पण या योजना अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला. या दोन्ही पक्षांच्या सरकारांची धोरणे केवळ मूठभर धनदांडग्यांच्या हिताची असतात. नोटाबंदी, जीएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. खासगी क्षेत्रातही आरक्षणाचे कोणी नाव काढत नाही. बसपा सत्तेत आल्यास आम्ही खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करू, असे मायावती म्हणाल्या.

बौद्ध धर्माची अनुयायी बनण्यासाठी मीसुद्धा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच दीक्षा घेईन. योग्य वेळ आल्यावर याचा निर्णय घेईन, अशी महत्त्वपूर्ण भूमिका बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनी सोमवारी नागपुरात जाहीर केली. बाबासाहेबांनी निधनाच्या काही काळ आधी बौद्ध धर्म स्वीकारला. तुम्ही लोक आता माझ्या धर्मांतरणाचा विचार करत असाल. मी बौद्ध धर्म स्वीकारणारच आहे, असे त्या म्हणाल्या.

जागर – बौद्धमयी लंका

 

आपली प्रतिक्रिया द्या