जम्मू कश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

675

जम्मू कश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यातील रेबान गावात जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे. गेल्या सहा तासांपासून ही चकमक सुरू असून अद्याप घटनास्थळी जवानांची शोध कारवाई सुरू आहे.

रेबान गावातील झैनपोरा भागातल्या एका घरात दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 178 व्या बटालियनचे जवान, राष्ट्रीय रायफल्स, विशेष कृती दलाने झैनपोरा भागात शोध कारवाई सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. सकाळी नऊ वाजता या भागात चकमक सुरू झाली.

आपली प्रतिक्रिया द्या