जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक, पोलीस कर्मचारी शहीद

906

देशात एकिकडे कोरोना व्हायरसचं संकट घोंघावत असताना दुसरीकडे जम्मू-कश्मीरमध्ये देश दुहेरी लढाई लढत आहे. कोरोनासारख्या अदृश्य शत्रुशी लढा देणाऱ्या जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले होत आहेत. शनिवारी कुलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी शहीद झाला आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, जम्मू कश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांवर दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी इथल्या मुख्य चौकीतील पोलीस आणि सीआरपीएफ जवानांवर बेछुट गोळीबार केला. पोलिसांकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं. पण, या हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल मोहम्मद अमीन जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

दुसरीकडे शनिवारी कश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठं यश हाती आलं आहे. बडगाम पोलीस, 53 राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफ यांच्या 153 जणांच्या बटालियनने बडगाम जिल्ह्यात शोधमोहीम आखली होती. त्या मोहिमेला यश आलं असून लश्कर ए तोयबाचा सहायक जहुर वाणीसह पाच दहशतवाद्यांना पकडण्यात यश आलं आहे. जहुर वाणीच्या चौकशीनंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या एका तळावर छापा मारून तो ताब्यात घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या