जम्मू-कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी घेतले साईबाबांचे दर्शन

सामना प्रतिनिधी । शिर्डी

जम्मू-कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सोमवारी शिर्डी येथे जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. जम्मू-कश्मीर बँकेच्या शिडीर्तील शाखेच राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तत्पुर्वी त्यांनी साईमंदिरात जावून साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर व विश्वस्त बिपीनराव कोल्हे यांनी त्यांचा सत्कार केला.

साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर बोलताना राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले की, दहशतवाद्यांची लढाई सामान्य जनतेशी नाही, तर सरकारशी आहे. तेथे मला धोका आहे, पण पर्यटकांना नाही. दहशतवादी पर्यटकांना त्रास देत नाही ही एक चांगली बाब आहे. पर्यटकांसाठी जम्मू-कश्मीर सुरक्षीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.