सात वर्षांत सीमेवर 90 जवान शहीद

402

जम्मू- कश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकड्यांची गेल्या सात वर्षांत तब्बल 6 हजार 942 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला आहे. यामध्ये सीमा सुरक्षा दलाचे 90 जवान शहीद झाले असून 454 जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

पाकड्यांची 2013 पासून ऑगस्ट 2019 पर्यंत जम्मू-कश्मीरच्या सीमेवर कितीवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले याबाबतची माहिती आरटीआय कार्यकर्ते डॉ. नूतन ठाकूर यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे मागितली होती. त्यानुसार सात वर्षांत 6 हजार 942 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची माहिती दिली आहे. 2018 मध्ये सर्वाधिक 2140 वेळा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे, तर चालू वर्षी 2047 घटना घडल्या आहेत. 2017 मध्ये 971, 2014 मध्ये 583, 2013 मध्ये 347 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.

2018 मध्ये जवानांचे सर्वाधिक बळी

हिंदुस्थानी जवानांची 2018 मध्ये मोठी हानी झाली आहे. कोणतेही युद्ध नसतानाही पाकडय़ांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात सर्वाधिक 29 जवान शहीद झाले असून 116 जण जखमी झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या