जम्मू कश्मीरमध्ये कॉलिंग आणि एसएमएस सेवा सुरू; सोशल मीडियावर निर्बंध कायम

403

जम्मू कश्मीरच्या 10 जिल्ह्यांमध्ये 2 जी सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, सोशल मीडियावर निर्बंध कायम राहणार आहेत. जम्मू कश्मीरच्या 10 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती जम्मू कश्मीरचे मुख्य सचिव रोहित कंसल यांनी दिली आहे. उत्तर कश्मीरमधील बांदीपोरा आणि कुपवाडामध्ये 2 जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. कश्मीर खोऱ्यात बँकांची ब्रॉडबँड सेवा पूर्णपणे सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस सेवाही सुरू करण्यात आल्या आहेत.

कश्मीर खोऱ्यात प्रीपेड सेवांवर असलेले निर्बंधही हटवण्यात आले आहेत. केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 ला जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटवण्यापूर्वी 4 ऑगस्टपासून राज्यात दूरध्वनी आणि मोबाईल सेवा बंद केल्या होत्या. जम्मू कश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर दूरध्वनी आणि मोबाईल सेवा सुरू करण्यात येतील, असे सरकराने स्पष्ट केले होते. त्यानंतर सरकारने टप्प्याटप्प्याने कश्मीर खोऱ्यातील दूरध्वनी आणि मोबाईल सेवा सुरू केल्या आहेत. आता व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएस सेवाही सुरू करण्यात आल्या असून सोशल मीडियावर निर्बंध कायम राहणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या