पाकड्यांची ‘नापाक’ हरकत, कूपवाडात गोळीबार, दोन जवान शहीद

army_jawan
फाईल फोटो

कश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होताना दिसत आहे. रविवारी सकाळीही पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात हिंदुस्थानी सैन्याचे दोन जवान शहीद झाले आहेत. तर या घटनेत एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

जम्मू कश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्यातील तंघर भागात रविवारी सकाळी पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. हिंदुस्थानी सीमेत घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला हिंदुस्थानी सैन्याने प्रत्युत्तर दिलं. मात्र, या बेछुट गोळीबारामुळे हिंदुस्थानचे दोन जवान शहीद झाले आहेत. दोन घरांचेही नुकसान झाले असून एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या