जम्मू कश्मीरच्या अखनूरमध्ये स्फोट; एक जवान शहीद, दोन जखमी

584

जम्मू कश्मीरच्या अखनूर जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटात लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे. तर दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. लष्कराच्या ट्रकमधून प्रवास करत असताना दहशतवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला. हा स्फोट आयईडीचा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. नियंत्रण रेषेजवळील पल्लनवाला भागात हा स्फोट झाला. जखमींना जवळच्या लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने परिसराची नाकाबंदी करून शोधमोहिम हाती घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या