कलम 370 आणि 35 ए रद्द करावा ही जम्मू कश्मीरच्या जनतेची इच्छा, भाजपचा दावा

122

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कश्मीरमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात मते मिळाली आहेत. याचा अर्थ जम्मू कश्मीरमधील कलम 370 आणि 35 ए कायदा रद्द करावा अशी इच्छा इथल्या जनतेची आहे असा दावा जम्मू कश्मीरच्या भाजपच्या नेत्यांनी केला आहे. तर दुसरीकडे नॅशनल कॉन्फरन्स स्वबळावर राज्यात सत्ता स्थापन करेल असा विश्वास कॉन्फरन्सच्या नेत्यांनी केला आहे. भाजपने उधमपूर, जम्मू आणि लडाख लोकसभा मतदारसंघात पुन्हा विजय मिळवला आहे तर नॅशनल कॉन्फरन्सने श्रीनगर, बारामुल्ला आणि अनंतनाग लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे.

शुक्रवारी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी कलम 370 आणि 35 ए नाही हटवू शकत. दोन्ही कायद्यांचे संरक्षण करणे हा आमचा अधिकार आहे.” तसेच आम्ही या देशाचे शत्रू नसून रक्षणकर्ते आहोत असेही अब्दुल्ला म्हणाले.

कश्मीरचे भाजपप्रदेशाध्यक्ष अनिल गुप्ता म्हणाले की, “फ़ारूख अब्दुल्ला कलम 370 आणि 35 ए हटवू देणार नसल्याच्या गोष्टी करतात, परंतु त्यांना तेवढे जनमत मिळाले नाही. त्याचे कारण हे कायदे हटवावे अशी इथल्या जनतेची इच्छा आहे.” तसेच लोकसभा निवडणुकीत विधानसभा आघाडीचा विचार करता इथे नॅशनल कॉन्फरन्स स्वबळावर राज्य स्थापन करू शकत नाही असेही गुप्ता म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सला 30 जागा मिळाल्या होता. त्या सर्व जागा कश्मीरमधल्या असून तिथे कमी प्रमाणात मतदान झाले होते. अनेक मतदारसंघात मताधिक्य हे खूप कमी असल्याचे गुप्ता यांनी म्हटले. तसेच श्रीनगर लोकसभा मतदारसंघात 15 विधानसभा मतदारसंघ येतात. या सर्व 15 ठिकाणी भाजपलाच आघाडी मिळाल्याचे गुप्ता यांनी सांगितले. तर जम्मू आणि लडाख भागतही कॉन्फरन्सचा प्रभाव नाही, या भागात नॅशनल कॉन्फरन्सला योग्य उमेदवार मिळाला नाही. त्यांनी केलेली महाआघाडी भाजपपुढे निष्प्रभ ठरल्याचेही गुप्ता यांनी म्हटले.

केवळ 30 विधानसभा मतदारसंघात नॅशनल कॉन्फरन्सला आघाडी आहे. या 30 जागांच्या बळावर नॅशनल कॉन्फरन्स कसे काय स्वबळावर राज्य स्थापन करणार असा सवाल गुप्ता यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला 46.4 टक्के मते मिळाली. नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आणि पीडीपीला या तीन पक्षांना मिळूनही एवढी मते मिळाली नाहीत असे गुप्ता म्हणाले. तसेच राज्यात अफस्पा हटवून, जमात ए इस्लाम संघटनेवर बंदी हटवून अब्दुल्ला खोर्‍यात शांतता कशी आणणार याचे त्यांनी स्पष्टीकरण द्यावे असेहे गुप्ता म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या