अपहरणकर्त्या हिजबुल कमांडर नायकूच्या वडिलांना पोलिसांनी सोडले

सामना ऑनलाईन । जम्मू

जम्मू कश्मीर पोलिसांनी शुक्रवारी हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर रियाज नाइकूच्या वडिलांना सोडले आहे. पोलिसांनी बुधवारी रियाजच्या वडिल असदुल्लाह नाइकू यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.  चौकशी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने दिली.

नोकरी सोडा! हिजबुल कमांडरची कश्मीरी पोलिसांना धमकी  

बुधवारी रात्री जम्मू कश्मीर पोलिसांनी असदुल्लासह पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. अतिरेक्यांनी पोलिसांच्या  कुटुंबीयांचे अपहरण केल्यानंतर या सहा जणांना ताब्यात घेतले होते. दहशतवाद्यांनी दक्षिण कश्मीरमधील कुलगाम, अनंतनाग आणि पुलवामा जिल्ह्यातील पोलिसांच्या ११ कुटुंबीयांचे अपहरण केले आहे. अपहरण झाल्यानंतर प्रशासनाने संपूर्ण खोर्‍यात हाय अॅलर्ट जारी केला आहे.