शेहला रशीदचे दावे खोटे, हिंदुस्थानच्या लष्कराने केली पोलखोल

756

अफवा पसरवून जम्मू-कश्मीरमधील वातावरणात तणाव वाढवण्याचा प्रयत्न स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. कश्मीर खोऱ्यात शांतता असून देखील सोशल मीडियावरून अफवा पसरवण्याचा प्रयत्न जम्मू-कश्मीर पीपल मुव्हमेंटच्या नेता शेहला रशीद हीने केला. शेहला रशीद हीने आपल्या ट्विटर हँडलवरून केलेला दावा खोटा असल्याचे हिंदुस्थानच्या लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर तिच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे वकील आलोक श्रीवास्तव यांनी शेहला रशीद हीच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. केंद्र सरकार आणि हिंदुस्थानच्या लष्कराच्या विरोधात चुकीच्या बातम्या पसरवल्याबद्दल शेहला रशीद हीच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्रीवास्तव यांनी केली आहे.

रविवारी 18 ऑगस्ट रोजी शेहला रशीद हीने कश्मीर खोऱ्यातील स्थिती संदर्भात एक ट्वीट केले होते. ज्यामध्ये कश्मीर खोऱ्यातून सैन्यातील जवान तरुणांना घरात घुसून ताब्यात घेत असल्याचा उल्लेख होता. मात्र सैन्याकडून हा दावा फेटाळण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या