कश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा अंदाधूंद गोळीबार, चिमुरडीसह चौघे गंभीर जखमी

762

जम्मू-कश्मीरमध्ये सोपोर जिल्ह्यातील डंगरपोरा भागात दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारमध्ये एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. यात उस्मा जान या चिमुरडीचाही समावेश आहे. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जम्मू-कश्मीर पोलीस घटनास्थळी पोहोचली असून लष्कराच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे.

शनिवारी सकाळच्या सुमारास दहशतवाद्यांनी सोपोर जिल्ह्यातील डंगरपोरा भागात गोळीबार केला. याच चार जण जखमी झाल्याची माहिती जम्मू-कश्मीर पोलिसांनी दिली आहे. पोलीस आणि लष्कराने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याची माहिती दिली आहे.

सोपोरमध्ये मजुरांवर गोळीबार
काही दिवसांपूर्वी सोपोरमध्ये बिहारमधून कामासाठी आलेल्या मजुरांना दहशतवाद्यांनी निशाणा बनवला होता. दहशतवाद्यांनी मजुरावर गोळी झाडली होती. गोळीबारात मजुराचा खांदा आणि मानेला गंभीर दुखापत झाली होती.

दरम्यान, जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवल्यापासून आकांडतांडव करणाऱ्या पाकिस्तानने खोऱ्यात दहशतवादी कारवायांसाठी मोठी तयारी केल्याचे उघड झाले होते. एलओसीजवळ दहशतवाद्यांचे तळही उभारल्याचे निदर्शनास आले. खोऱ्या दहशतावद्यांच्या घुसखोरीसाठी सीमारेषवर पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या