जम्मू कश्मीरमध्ये पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, दोन पोलीस शहीद

प्रातिनिधीक फोटो

जम्मू कश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरमधील नौगाम सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात दोन पोलीस शहीद झाले आहेत. शुक्रवारी सकाळी हा हल्ला झाला. यावेळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी देखील ठार झाला.

देशभरात सध्या स्वातंत्र्यदिनाची लगबग आहे. त्या पार्श्वभूमीवर जम्मू कश्मीरमध्ये देखील स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे. दरम्यान श्रीनगरमधील नौगाममध्ये गस्त घालणाऱ्या पोलिसांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले. एक पोलीस जखमी झाला असून त्याच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या