कश्मीर – लष्कर-ए-तोएबाच्या २ दहशतवाद्यांचा खात्मा

39
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमधील हांदवाडामध्ये जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घातले आहे. हांदवाडाच्या वारिपोरा भागामध्ये लष्कर आणि लष्कर-ए-तोयबाच्या दहशवाद्यांमध्ये चकमक झाली. वारिपोरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिल्यानंतर दहशवाद्यांविरोधात शोध मोहीम हाती घेण्यात आली. दहशवाद्यांचा शोध सुरू असताना जवानांवर गोळीबार करण्यात आला. त्याला चोख प्रत्युत्तर देताना जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळत आहे. जंगलात आणखी दहशतवादी लपले असण्याची शक्यता असल्याने शोध मोहीम सुरू आहे.


ठार करण्यात आलेले दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या संघटनेचे आहेत. चकमकी दरम्यान दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रही जप्त करण्यात आली असून परिसरात आणखी शोध घेतला जात आहे. काही दिवसांपासून कश्मीरमध्ये लष्करी ताफ्याला लक्ष्य केल्याच्या घटना घडल्याने संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या