कश्मिरात दहशतवादी हल्ला; दोन पोलीस, दोन नागरिकांचा मृत्यू

17
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमध्ये पोलीस पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये दोन पोलीस शहीद झाले आहेत. दहशतवादी हल्ल्यामध्ये दोन नागरिकांनाही जीव गमवावा लागला आहे. तसंच तीन पोलीस आणि पाच नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे.

कुलगाम जिल्ह्यातील मीरबाजार-काजीकुंड भागामध्ये हा हल्ला झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. दहशतवाद्यांनी जम्मू-श्रीनगर हायवेवरील पोलीस पथकाला लक्ष्य करत गोळीबार केला. यात दोन पोलीस आणि दोन नागरिकांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या