पुरुषांमध्येही आढळतोय हा गंभीर आजार, वाचा सविस्तर

2442
male-breast-cancer

झारखंड राज्यात कोल्हान भागामध्ये पुरुषांमध्ये जीवघेणा आजार वाढत असल्याचे समोर आले आहे. पुरुषांमध्ये अशा प्रकारचे आजार हे विरळ असतात. परंतु या भागात पुरुषांतील स्तन कॅन्सर वाढत चालल्याची दोन प्रकरणं समोर आली आहेत.

दैनिक जागरण या वृत्तपत्राने यासंदर्भात एक महत्त्वाची बातमी दिली आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास आतापर्यंत 20 रुग्णांमध्ये याची पुष्टी झाली आहे. जेव्हा शेवटच्या टप्प्यावर पोहोचला तेव्हा बहुतेक लोकांना हा आजार झाला. बर्डी येथील पंन्नास वर्षाचे संजय सिंग यांना ह्या आजाराला सामना करावा लागला. सतत त्यांचा पोटात आणि छातीत वेदना होत. डॉक्टरांना दाखवल्यावर डॉक्टरांना याबद्दल कल्पना आली नाही. गेल्या दीड वर्षांपासून डॉक्टर त्यांना गॅसचा समस्येवर औषध देत राहिले. या आजाराला त्रत्स झालेले संजय यांनी तज्ज्ञ डॅाक्टरांना या बद्दल माहिती दिली. संजयने छातीतील गाठ व आणि पोटदुखीची माहिती डॉक्टरांना सांगितली. त्यानंतर त्यांची बायोप्सी करण्यात आली.

डॉक्टरांच्या रिपोर्ट नुसार त्यांच्या छातीतील गाठ ही कॅन्सरमुळे झाली. यावर त्यांचा विश्वास बसला नाही. आता पर्यत महिलांनाच स्तन कॅन्सर होतो असा समज त्यांना होता. यानंतर ते उपचारासाठी मुंबई मधील टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयात गेले. येथे केलेल्या उपचार दरम्यान स्तन कॅन्सरची पुष्टी झाली. यानंतर त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली. पुन्हा पाच वर्षानंतर कॅन्सरची लक्षणे दिसून आली.

सध्या महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. येथे त्यांना हार्मोन थेरेपी देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या