पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात जनसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ -मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांची जनसंवाद अभियान यात्रा रविवारी कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात दाखल झाली. या विभागातील डिगस, हुमरमळा, अणाव, पणदूर, पावशी, आंबडपाल, बांव, बांबुळी, सोनवडे याठिकाणी आमदार वैभव नाईक यांनी भेटी देऊन ग्रामस्थ व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गावातील समस्या जाणून घेतल्या. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पावशी विभागात आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या विकास कामांची माहिती जनतेला देण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनीही आपल्या समस्या,प्रश्न आ. वैभव नाईक यांच्या समोर मांडले.त्याला समाधान कारक उत्तरे देत येत्या काळात लोकांचे प्रश्न समस्या त्याचप्रमाणे उर्वरित विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी दिले. पावशी विभागात जनसंवाद अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या अभियान दौऱ्यात महिला आघाडी विधानसभा संपर्क प्रमुख सुचिता चिंदरकर, महिला आघाडी जिल्हा संघटक जान्हवी सावंत, जि.प.सदस्य अमरसेन सावंत, उपसभापती श्रेया परब, पं.स.सदस्य जयभारत पालव, महिला आघाडी तालुका संघटक स्नेहा दळवी, माजी पं.स.सदस्य अतुल बंगे, विभागप्रमुख दिपक आंगणे, उपविभाग प्रमुख बाळू पालव, महिला विभाग प्रमुख जान्हवी पवार, आ.वैभव नाईक यांची सुकन्या नंदीनी नाईक आदींसह पदाधिकारी सहभागी झाले होते.

आमदार वैभव नाईक म्हणाले, महामार्ग चौपदरीकरण, हत्ती प्रश्न यांसह अनेक प्रश्न आम्ही गेल्या पाच वर्षांत मार्गी लावले आहेत. पणदूर-घोडगे घाटाचेही काम लवकरच पूर्णत्वाकडे जाईल. तुम्ही सर्वांनी मला आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर पाच वर्षांत या भागाचा लोकसेवक म्हणून प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आहे. रस्ते, वीज, पाणी यांसह अनेकविध विकासकामे मार्गी लावली. पुरहानीची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठीही आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. प्रत्येकाना नुकसान भरपाई मिळणार आहे. शिवसेनेच्या माध्यमातूनही पूरग्रस्तांना मदत केली जात आहे. शिवसेनेच आमची सदैव साथ तुमच्या सोबत आहोत. तुमचेही असेच प्रेम व सहकार्य निश्चितच आम्हाला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डिगस जाधववाडी येथील काशिराम जाधव यांच्या निवासस्थानी या विभागाची पहीली बैठक झाली. यावेळी ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्या तातडीने सोडविण्याचा शब्द आ.नाईक यांनी दिला. माजी उपसरपंच बाळा पवार, राजू पवार, शाखाप्रमुख प्रशांत जाधव, भास्कर पवार, संजय तावडे, लक्ष्मण वरक, मंदार कोठावळे, संतोष गोसावी, नारायण (बाबू) सावंत, भरत जाधव, सत्यवान पवार, प्रकाश शिंदे, सचिन मुळीक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.दुसरी बैठक चोरगेवाडी येथे संदेश पवार यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी जान्हवी पवार, वामन धावले, अनंत सुर्वे,दिपक चोरगे, शर्मिला चोरगे, शाली चोरगे, आशा निकम, उज्वल चोरगे, सायली चोरगे, बबन चव्हाण, भाऊ धावले, उदय धावले, दिपिका चोरगे, विनय धावले, प्रविण मराठे, बाबू सावंत, अशोक लुडबे, आपा चव्हाण, गोविंद पालव, प्रशांत चव्हाण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कर्ल्याचे गाळू येथे बोअरवेल तसेच सुर्वेवाडी ते परबवाडी पर्यंत भेडसावत असलेली वीज समस्या तातडीने मार्गी लावण्याची ग्वाही आ.नाईक यांनी ग्रामस्थांना दिली. गावविकास पॅनलचे ग्रा.पं.सदस्य मनोज पाताडे यांनी यावेळी उपस्थित राहून त्यांनी सूचवलेली कामे आमदार वैभव नाईक यांनी मंजूर केल्याबद्दल आ.नाईक यांचे आभार मानले. तसेच डिगस चोरगेवाडी ते वेताळबांबर्डे दरम्यान नदीवर साकव मंजूर करण्याची मागणी मनोज पाताडे यांनी आ.नाईक यांच्याकडे करताच आ.नाईक यांनी नाबार्डमधून हे काम मंजूर करण्याचे आश्वासन दिले.

डिगस नंतर हुमरमळा येथील श्री देव चव्हाटेश्वर मंदीरात बैठक पार पडली. तत्पूर्वी आमदार वैभव नाईक यांनी श्रींचे दर्शन घेतले. यावेळी सरपंच जान्हवी पालव, शिवाजी पालव, पांडूरंग पालव, उत्तम पालव, भास्कर गोसावी, दिनकर पालव, संचिता पालव, शुभम पालव, शाखा प्रमुख कृष्णा कदम, समिर पालव, अनिल पालव, कृष्णा पालव, दिपक सांवत, प्रमोद पालव, तानाजी पालव, सोनल पालव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.अणाव येथील रामेश्वर वाचनालयाच्या सभागृहात बैठक झाली. यावेळी शाखा प्रमुख बाबा परब, सुधीर पालव, ग्रा.पं.सदस्य गजानन कुलकर्णी, समिर आंगणे, मृणाल परब, शिवराम अणावकर, शेखर परब, सुनील अणावकर, लिलाधर अणावकर, शेखर माळवे, धाकू अणावकर, बाळकृष्ण जाधव, सुनील जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

अणावनंतर आमदार वैभव नाईक यांनी पणदूर साईलवाडी विजय साईल यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी माजी सरपंच डॉ.श्यामसुंदर सावंत, शिवराम पणदूरकर, शाखाप्रमुख प्रताप साईल, नम्रता परब, गणपत सावंत, शिवाजी साईल, रूपेश शिरोडकर, विजय साईल, सोमा साईल, प्रभाकर साईल आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच डॉ. श्यामसुंदर सावंत यांनी प्रास्ताविक करताना सर्वसामान्यांचे आमदार म्हणून आ. वैभव नाईक यांनी नावलौकिक केल्याचे गौरवोद्गार काढले. तसेच गावातील समस्या मांडल्या. त्या आ.नाईक यांनी मार्गी लावण्याची ग्वाही दिली. दरम्यान पणदूरची ग्रामदेवता श्री देवी सातेरीचे आ.नाईक यांनी दर्शन घेतले. पावशी सरपंच बाळा कोरगांवकर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीस सभापती राजन जाधव, माजी पं.स.सदस्य अतुल बंगे, पावशी सरपंच बाळा कोरगांवकर, ग्रा.पं.सदस्य सागर भोगटे, कन्हैया वायंगणकर, देऊ खोत,बाबा पावसकर, दादा खोत, प्रसाद शेलटे, गुरूप्रसाद तवटे, गिरीश सुकी, धिरेंद्र चव्हाण, सुयोग ढवण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. आंबडपाल येथील भरत चव्हाण यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीस सरपंच प्रणिता नाईक, ग्रा.पं.सदस्य भरत आंबडपालकर, धिरेंद्र चव्हाण, शाखा प्रमुख विष्णू वंजारे, आबा नाईक, माजी सरपंच प्रविण सावंत, आरती नाईक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

बांव येथे ग्रा.पं.च्या हाॅल मध्ये बैठक झाली. यावेळी शाखा प्रमुख अनंत आसोलकर, प्रशांत परब, मनोहर टोपले, संदेश सामंत, दिपक राऊत, दिपश्री राऊत, सायली परब, प्रणिता परब, हरी परब, मधू मांजरेकर, संदेश सामंत, रामदास परब, प्रदीप तुळसकर उपस्थित होते. सोनवडे मठवाडी येथील श्री देव ब्राह्मण मंदीरात बैठक पार पडली. यावेळी सरपंच शब्दाली सोनवडेकर, माजी सरपंच वनिता सानेकर, महादेव सावंत, शाखा प्रमुख अजित शिरोडकर, श्रीकृष्ण खांदारे, अरविंद शिरोडकर, शरद शिरोडकर, नरेंद्र धुरी, नंदीनी धुरी, मिथून जावकर, किशोर शिरोडकर, बाळा आसोलकर, रागो गवस आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.बांबुळी येथे संदीप मयेकर यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यावेळी शंकर परब, दादू परब, सिताराम बांबुळकर, वासूदेव परब, मनोहर परब, भगवान मयेकर, अरूण बांबुळकर, सुरेश पेडणेकर, कृष्णा तेली, नितीन सावंत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

धनुष्यबाणाच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे राहून भक्कम साथ द्या : चिंदरकर
महिला संपर्क प्रमुख सुचिता चिंदरकर म्हणाल्या की, आमदार वैभव नाईक यांनी पाच वर्षात या भागातील जनतेला अपेक्षित असे काम केले आहे. सर्वसामान्यांचे आमदार म्हणून ते ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघावर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा आणि धनुष्यबाणाच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे राहून भक्कम साथ द्या.

आपली प्रतिक्रिया द्या