जनशताब्दीला सावंतवाडीला थांबा मिळणार

719

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ट्रेन क्र.12051/12052 दादर-मडगाव जंक्शन-दादर जनशताब्दी एक्स्प्रेसला आता सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. 30 ऑगस्टपासून सहा महिने प्रायोगिक तत्त्वावर सावंतवाडी स्थानकात दोन मिनिटांचा थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी शिवसेनेने पाठपुरावा केला होता.

 कोकण रेल्वेच्या मान्सून वेळापत्रकाप्रमाणे जनशताब्दी एक्सप्रेस सकाळी 5.25 वाजता दादर स्थानकातून सुटून दुपारी 1.46 वाजता सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल, तर मडगावहून दुपारी 12.15 वाजता दादरला जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस दुपारी 1.30 वाजता सावंतवाडी स्थानकात पोहोचेल. तसेच रेल्वेच्या नियमित वेळापत्रकाप्रमाणे दादर-मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस

1 नोव्हेंबरपासून दुपारी 12.40 वाजता सावंतवाडी स्थानकात येईल. मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस दुपारी 3.44 वाजता सावंतवाडी स्थानकात पोहोचेल.

 

आपली प्रतिक्रिया द्या