Photo – मनमोहक मोनोक्रोम लूकमध्ये जान्हवी कपूर

बॉलिवूडची ग्लॅमरस गर्ल जान्हवी कपूर कायम चर्चेत असते. आपले वेगवेगळे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

नुकताच तिचा डिस्ने प्लस हॉटस्टार वर “गुड लक जेरी” नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये जान्हवी ड्रग पेडलरची भुमिका करत आहे.

“जेरीला प्रेमाने स्वीकारल्या बद्दल धन्यवाद” असे फोटोसोबत कॅप्शन दिले आहे.

नेहमी ग्लॅमरस लूक्समध्ये दिसणारी जान्हवी या मोनोक्रोम स्टाईलमध्ये सुंदर दिसत आहे.

जान्हवीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कंमेट्सचा पाऊस पाडला आहे.

“धडक”, “रूही”, ” गुंजन सक्सेना” अशा एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.