Photo – पांढऱ्या फ्लोरल प्रिंट साडीत जान्हवीच्या दिलकश अदा

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या स्टाईल स्टेटमेण्टमुळे कायम लाईमलाईटमध्ये असते. तिचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. नुकतेच जान्हवीने आपले काही साडीतले फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे. या फोटोंवरुन चाहत्यांच्या नजरा तिच्यावरुन  हटेनाशा झाल्या आहेत.

जान्हवीचे साडीप्रेम कोणापासून लपलेले नाही. तिला वेस्टर्न कपड्यांबरोबर साडीही प्रचंड आवडते. तिच्याकडे साड्यांचे चांगले कलेक्शन आहे. 

जान्हवीने शिफॉनची पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये दिसली. या साडीवर फ्लोरल प्रिंट दिसत आहे. जी लक्ष वेधून घेत आहे.

जान्हवीने साडीबरोबर जो ब्लाऊज घातला आहे, त्याने तिच्या लूकमध्ये बोल्डनेस दिसत आहे.

ब्लाउजच्या पॅटर्नमुळे साडी खुलून दिसत आहे.

या लूकसाठी जान्हवीने साधा मेकअप केला असून त्यावर ड्रॉपडाउन ईयररिंग्स घातले आहेत.

जान्हवी या लूकमध्ये खूप सुंदर दिसत असून चाहत्यांकडून तिच्या लूकचे कौतुक होत आहे.

वेस्टर्न कपड्यांबरोबरच ती हिंदुस्थानी पेहरावातही तितकीच सुंदर दिसते.