जान्हवीनंतर आता खुशी कपूरही करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माते बोनी कपूर यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर हिने काही काळापूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. धडक या तिच्या पहिल्या चित्रपटाने तिने बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल टाकलं.

आता तिच्या पावलावर पाऊल टाकत तिची धाकटी बहीण खुशी ही देखील बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यास सज्ज झाली आहे. लवकरच एक मोठी घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती तिचे वडील आणि निर्माते बोनी कपूर यांनी दिली आहे.

माध्यम प्रतिनिधींना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याचा उलगडा केला आहे. खुशी हिलाही अभिनयाची आवड आहे. त्यामुळे ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल. याची घोषणाही लवकरच करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

बॉलिवूडमधील नेपोटिझम वादाबाबत बोलताना बोनी कपूर म्हणाले की, खरंतर कुणीतरी खुशीला लाँच करावं या प्रयत्नात मी होतो. कारण, माझ्याकडे चित्रपट निर्मितीचा अनुभव आणि यंत्रणा असली तरीही मी वडील म्हणून तिच्या पदार्पणासाठी मदत केली असा आरोप माझ्यावर होऊ शकतो, असं बोनी यावेळी म्हणाले.

खुशी हिची मोठी बहीण जान्लवीने धडक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सैराटचा हिंदी रिमेक असलेला हा चित्रपट तिकीटबारीवर फारसा चालला नाही. त्यानंतर घोस्ट स्टोरीज आणि गुंजन सक्सेना या चित्रपटांमध्ये दिसली होती.

आपली प्रतिक्रिया द्या