कोरोना मदत फंडातील निधीतून बनवली विशाल प्रतिमा; पर्यटनवाढीसाठी निर्णय

देशभरासह जगात कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. कोरोना महामारीमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना फटका बसला आहे. तसेच अनेक उद्योगधंदेही ठप्प आहेत. कोरोना महामारी, लॉकडाऊन यामुळे पर्यटन व्यवसायही ठप्प झाला आहे. पर्यटनवाढीला चालना मिळाल्यास अर्थव्यवस्थेला गती मिळेल, यासाठी जपानमधील एका शहरात कोरोना मदत फंडातील निधी वापरून एक विशाल प्रतिमा बनवण्यात आली आहे.

या निर्णयामुळे पर्यटन वाढ होणार असून निधीचा योग्य उपयोग करण्यात आला आहे. कोरोना महामारीमुळेच पर्यटनाला फटका बसला होता. आता कोरोना मदतनिधी वापरून पर्यटनाला चालना देण्यात येत आहे. जपानच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या नोटो शहराने पर्यटन वाढीसाठी ही अभिनव संकल्पना राबवली आहे. रॉयटर्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.

नोटो शहरात विशाल स्क्वि़ड फिशची प्रतिमा उभारण्यात आली आहे. या भागात या प्रकारचे मासे मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे त्याचे आकर्षण आहे. हे आकर्षण लक्षात घेत ही प्रतिमा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारनेही पर्यटनवाढीसाठी घेण्यात आलेल्या या निर्णयला सकारात्मक पाठिंबा देत कोरोना मदतनिधीतील रक्कम त्यासाठी दिली आहे.

स्क्विड फिशची ही विशाल प्रतिमा उभारण्यासाठी सुमारे सुमारे 1.60 कोटींपर्यंतचा खर्च झाला आहे. त्यासाठी सरकारने कोरोना मदतनिधीतून पैसे खर्च केल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, या निर्णयामुळे नोटो शहरात पर्यटन वाढण्यास सुरुवात झाली आहे. अनेकजण या प्रतिमेच्या आकर्षणामुळे शहराला भेट देत आहेत. त्यामुळे निधी योग्य कारणासाठी खर्च झाल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या