गले में खिच खिच… कोरोना नाही, निघाला कीडा

जपानमध्ये (Japan) एका महिलेच्या घशात खवखवत (Sore Throat) होते. ती तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी गेली. मात्र डॉक्टर तिचा वैद्यकीय तपासणी अहवाल पाहून हैराण झाले. कारण तिच्या टॉन्सिल मध्ये एक जिवंत कीडा (अळी) (Live Worm In Tonsils) आढळला. त्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करून उपचार करण्यात आले.

‘द अमेरिकन सोसाइटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन एंड हाइजीन’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका केस स्टडी नुसार, टोकियोतील 25 वर्षीय महिलेने नुकतेच सेंट ल्यूक इंटरनेशनल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी केली. तिने डॉक्टरांना सांगितले की तिने ‘साशिमी’ खाल्यानंतर घशात खवखवत असल्याचे जाणवले. साशिमी, एक जपानी पदार्थ आहे, जो ताज्या कच्या माशांपासून बनवला जातो.

‘द गार्डीयन’ मधील माहितीनुसार, डॉक्टरांनी महिलेच्या उजव्या टॉन्सिलमधून 1.5 इंच लांबीचा आणि 1 मिमी रुंदीचा कीडा काढला. टॉन्सिलमधून चिमट्याचा वापर करून बाहेर काढल्या नंतर कीडा जिवंत होता. हा कीडा म्हणजे एक प्रकारची अळी आहे. डीएनए तपासणी केल्यावर ‘निमेटोड राउंडवॉर्म’ असल्याचे स्पष्ट झाले. हे परोपजीवी कीडे कच्चे मांस खाणाऱ्या लोकांना संक्रमित करू शकतात असेही यात नमूद केले आहे.

डॉक्टरांनी सांगितले की अळी बाहेर काढल्यानंतर महिलेची प्रकृती सुधारली आहे. रक्त तपासणीचे अहवाल देखील तब्येत चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे.

सीएनएनच्या माहितीनुसार, दूषित अन्न किंवा कच्चे अन्न सेवन केल्यास अशा प्रकारचे त्रास झाल्याची उदाहरणे आधी देखील समोर आली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या