…आणि जपानचे पंतप्रधान खड्ड्यात पडले

28

सामना ऑनलाईन। वॉश्गिंटन

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गोल्फ हा खेळ खूपच आवडतो. यामुळे ट्रम्प जपानला आले असता पंतप्रधान शिंजो आबे हे त्यांच्याबरोबर गोल्फ खेळायला गेले. पण खेळाच्या मध्येच ते चक्क घसरुन एका खड्डयात पडले. विशेष म्हणजे आपल्या मागे आबे खड्ड्यात पडले हे ट्रम्प यांना कळलेच नाही. ते आपले रमतगमत गोल्फ मैदान पाहात होते. या मजेशीर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लाखो लोकांनी पाहिला आहे.

ट्रम्प सध्या आशियाई देशांच्या दौऱ्यावर आहेत. याचदरम्यान त्यांनी जपानला भेट दिली. यावेळी त्यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची भेट घेतली. दोघेजण गोल्फ खेळण्यासाठी गेले. खेळून झाल्यावर ट्रम्प काही अधिकाऱ्यांशी गप्पा मारत पुढे निघून गेले. पण आबे मात्र मागेच राहिले. त्यांनी पळत येत गोल्फच्या रिंगनाबाहेर येण्याचा प्रयत्न केला असता पाय घसरुन ते पुन्हा आत पडले. आबे पडल्याची साधी भनकही ट्रम्प यांना नव्हती. शेवटी काही अधिकारी आबेंच्या मदतीला धावले आणि त्यांना रिंगमधून बाहेर येण्यास मदत केल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडिओवर लोकांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकाने ट्रम्प यांचा जपान दौरा आणि पंतप्रधान जमीनीवर पडले काय हा योगायोग असे म्हटले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या