जपानच्या पंतप्रधानांचा पाणीपुरीवर ताव

हिंदुस्थान दौऱ्यावर असलेले जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील बुद्ध जयंती पार्कात फेरफटका मारला. यावेळी किशिदा यांनी पाणीपुरीवर ताव मारला. लस्सी आणि पन्हं याचाही त्यांनी आस्वाद घेतला. नंतर पार्कातील लाकडी बाकांवर बसून मोदी आणि किशिदा यांनी गप्पाही मारल्या.