रोबोट करणार अंत्यसंस्कार

26

सामना ऑनलाईन । टोकियो

जपानमधील  एका कंपनीने माणसासारख्या दिसणाऱया एका रोबोटवर मरण पावलेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी सोपवली आहे. या रोबोटचे नाव ‘पेपर’ असे असून बौद्ध पुजाऱयांप्रमाणे श्लोक पठण करून हा रोबोट अंत्यसंस्काराची विधीपूर्ण करतो. त्याचबरोबर हा रोबोट डुम्सदेखील उत्तमरीत्या वाजवतो. निसेई कॉर्पोरेशन या कंपनीने टोकियोमध्ये लाइफ एडिंग इंडस्ट्री एक्स्पोदरम्यान या पेपर रोबोटचे सादरीकरण केले. मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱया बौद्ध पुजाऱयाची संख्या कमी होत असल्याने आता याकामी पेपर रोबोटची मदत घेतली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या