प्रसिद्ध अभिनेत्रीला अचानक दिसणे झाले बंद, वाचा डॉक्टर काय म्हणाले ते..

प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री जॅस्मिन भसीन हिच्याबाबत चिंताजनक बातमी समोर आली आहे. कॉन्टॅक्ट लेन्समुळे जॅस्मिनच्या डोळ्याच्या बुब्बुळांना दुखापत झाल्याने तिला अचानक दिसायचे बंद झाले आहे. सध्या तिच्या डोळ्यांवर उपचार सुरु आहेत.

जॅस्मिनने सांगितले की, कॉन्टॅक्ट लेन्समुळे तिच्या बुब्बुळांना दुखापत झाली आहे आणि अचानक तिला दिसायचे बंद झाले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहे. टाईम्स ऑफ इंडियाला तिने दिलेल्या माहितीनुसार, तिला 17 जुलैपासून डोळ्यांना त्रास सुरु झाला, तिने एका इव्हेन्टसाठी लेन्स वापरले होते. लेन्स डोळ्यात घातल्यानंतर तिला डोळ्यांना वेदना होऊ लागल्या आणि त्या वाढू लागल्या होत्या. त्यानंतर तिला अचानक काहीच दिसेनासे झाले.

जॅस्मिन म्हणाली की, 17 जुलैला दिल्लीतील एका इव्हेण्टसाठी ती तयार होत होती. मला माहित नव्हते माझ्या लेन्समध्ये काहीतरी समस्या होती, मात्र ते वापरल्यानंतर अचानक डोळ्यात वेदना होऊ लागल्या. मी डॉक्टरकडे जाऊ इच्छित होती, मात्र कामाप्रती बांधिल असल्यानुळे मला इव्हेंटसाठी थांबावे लागले. मात्र त्यानंतर माझी अवस्था बिकट झाली. मी वेळ मारुन नेण्यासाठी गॉगलही घातला पण माझ्या वेदना वाढू लागल्या आणि अखेर मला काहीच दिसेनासे झाले.

जॅस्मिन भसीन हिच्यावर सध्या उपचार सुरु आहे आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तिच्या डोळ्यांना बरे होण्यासाठी आणखी थोडा वेळ लागेल. जॅस्मिनने सांगितले की, डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्यांनी बुब्बुळांना दुखापत झाल्याचे सांगितले आणि त्यांनी माझ्या डोळ्यांवर पट्टी लावली. माझ्या डोळ्यांवर आता उपचार सुरु आहेत आणि मला वेदनाही होत आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, मी 4 ते 5 दिवसात बरी होईन. मात्र तोपर्यंत मला माझ्या डोळ्यांची काळजी घ्यायला हवी. सुदैवाने, मला यासाठी माझे कोणतेही काम रद्द करावे लागले नाही. मी काही दिवसात बरी होईन आणि कामावर परतेन असेही ती यावेळी म्हणाली.