टीम इंडियाला मोठा धक्का, जसप्रीत बुमराह टी-20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर

jasprit-bumrah

पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक खेळला जाणार असून त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह या स्पर्धेमधून बाहेर पडला आहे. विश्वचषकाला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिला असताना टीम इंडियाच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. आशिया चषकमधून दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत संघात पुनरागमन केले होते. मात्र आता तो टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे.

बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा भाग होता, परंतु 28 सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात तो पाठीच्या दुखापतीमुळे खेळला नाही. आता मिळालेल्या माहितीनुसार, बुमराहला पाठीचा स्ट्रेस फ्रॅक्चर झाला आहे आणि त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेव्यतिरिक्त टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. मोहम्मद शमीचा टी-20 विश्वचषक संघात स्टँडबाय म्हणून समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे बुमराहच्या जागी तो संघात सामील होऊ शकतो, असे झाल्यास मोहम्मद सिराजला स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत टाकले जाऊ शकते. बुमराह अशाप्रकारे स्पर्धेतून बाहेर पडणे टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे.