चौथ्या कसोटीआधी टीम इंडियाला धक्का, खासगी कारणास्तव बुमराह संघातून बाहेर

इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी आधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा काही खासगी कारणास्तव हा कसोटी सामना खेळू शकणार नाहीए. त्यामुळे आता त्याच्या जागी पुन्हा एकदा मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते.

बीसीसीआयने पत्रक जारी करत बुमराहने माघार घेतल्याचे सांगितले आहे. ‘जसप्रीत बुमराहने काही खासगी कारणास्तव हा सामना खेळता येणार नसल्याचे कळवले आहे. त्याची विनंती आम्ही मान्य केली असून तो चौथी कसोटी खेळणार नाही.’, असे बीसीसीआयने त्या पत्रकात म्हटले आहे. बुमराहने कोणत्या कारणावरून संघातून माघार घेतली हे अद्याप समोर आलेले नाही.

बुमराहच्या जागी चौथ्या कसोटीत मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते. दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहला विश्रांती दिली होती तेव्हा देखील त्याच्या जागी सिराज खेळला होता. मात्र त्या कसोटीत त्याला फक्त एकच बळी घेतला आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या