जावेद अख्तर यांनी कंगनाला धमकावले, रंगोलीचा दावा

858

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि वाद यांचे जुने नाते आहे. हृतिक, आलिया, रणबीर, करण जोहर यांच्यासोबत वाद घातल्यानंतर आता कंगनाने तिचा मोर्चा जावेद अख्तर व महेश भट्ट यांच्याकडे वळवला आहे. कंगनाची बहिण रंगोली चंडेल हिने जावेद अख्तर यांनी कंगनाला धमकावले होते असा दावा केला आहे. रंगोलीने एक ट्विट करून हा खळबळजनक दावा केलाय.

‘जावेद अख्तर यांनी कंगनाला फोन करून तिला धमकावले होते व त्यांनी हृतिकची माफी मागायला तिला सांगितले. कंगनाने सुसाईड बॉम्बरची भूमिका करायला नकार दिला तेव्हा महेश भट्ट यांनी कंगनावर चप्पल फेकून मारली होती. हे लोकं पंतप्रधानांना कट्टरतावादी म्हणतात. काका तुम्ही दोघं काय आहात? असे ट्विट रंगोलीने केले आहे. जावेद अख्तर व महेश भट्ट यांनी एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कट्टरतावादी म्हटले होते. त्यावरून टीका करताना रंगोलीने त्यांच्यावर टीका केली आहे.

फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट्ट ला मिळाल्यानंतर देखील रंगोलीने आलियावर टिकास्त्र सोडले होते. रंगोलिने आलियाला जिहादी म्हटलं होतं. आलियाने तिच्या चित्रपटांमध्ये मुस्लीम तरुणींच्या भूमिका केल्या आहेत. त्यावरून तिने आलियाला फटकारले होते.

आपली प्रतिक्रिया द्या