अभिनेत्याच्या मुलीला ऑनलाईन वर्गातून हाकलून दिलं, कारण वाचून तुम्हीही हादराल

बॉलीवूडमध्ये ज्यांचं नशीब चांगलं असतं त्याच कलाकारांची चलती असते आणि तेच कलाकार दीर्घकाळपर्यंत या क्षेत्रात टीकून राहतात. अनेक कलाकार हे चांगली कमाई व्हावी यासाठी झगडत असतात , मात्र त्यात त्यांना यश मिळतंच असं नाही. जावेद हैदर नावाचा अभिनेता हा बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत आला होता. त्याने वाँटेड, दबंग 3, राधे सारख्या सलमान खानच्या चित्रपटात भूमिकाही केल्या आहेत. बऱ्याच चित्रपटांत काम केल्यानंतरही जावेदची आर्थिक परिस्थिती हे बेताची राहिली आहे. कोरोनाच्या काळात त्याची स्थिती आणखीनच बिघडली.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधून बबिता बाहेर? वाचा काय आहे खरं…

जावेदला एक मुलगी असून ती 8वीत शिकते आहे. मुलीला उत्तम शिक्षण मिळावं यासाठी जावेद सातत्याने धडपडत असतो. जोपर्यंत त्याच्याकडे काम होतं, तोपर्यंत त्याला फारशी अडचण येत नव्हती. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याला काम मिळेनासं झालं आहे. ज्यामुळे त्याच्या आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत बंद झाला आहे. या आर्थिक परिस्थितीमुळे जावेदने मुलीच्या शाळेचा दरवाजा ठोठावला होता. तिथे जाऊन त्याने विनंती केली होती की त्याचं उत्पन्न बंद झालं असून तो शाळेची फी भरू शकत नाहीये. शाळेने त्याचं म्हणणं ऐकून 3 महिन्यांची फी माफ केली होती.

रेड ऑफ शोल्डर गाऊनमध्ये नोरा फतेहीचा हॉट अंदाज

जावेदने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की जवळपास 2 वर्ष त्याची मुलगी ऑनलाईन पद्धतीने शिकते आहे. आजपर्यंत आपण फी वेळेवर भरली होती, मात्र आर्थिक परिस्थिती बिघडल्याने मी फी भरू शकलो नव्हतो असं जावेदचं म्हणणं आहे. फी भरली नाही म्हणून शाळेने माझ्या मुलीला ऑनलाईन वर्गातून बाहेर काढलं असं जावेदने म्हटलं आहे. यानंतर मी इकडून तिकडून पैसे जमा करून फी भरली तेव्हा माझ्या मुलीला पुन्हा वर्गात सामील केलं गेलं असं जावेदने म्हटलंय. जावेद मुलीच्या शाळेसाठी दर महिना 2500 रुपये फी भरतो. जावेदने म्हटलंय की चित्रपटसृष्टीतील लोकांकडे पैसा मागायला त्याला लाज वाटते. पैसे मागितल्यानंतर समोरच्याने तुम्हाला टाळायला सुरुवात केली तर भविष्यातील कामावरही परिणाम होईल अशी भीती जावेदला वाटत असते. ज्यामुळे त्याने चित्रपटसृष्टीत नसलेल्या लोकांकडून पैसे उधार घेतले आहेत. बायकोचे दागिने, घराची कागदपत्रेही आपण गहाण ठेवली असल्याचं जावेदने म्हटलंय.

आपली प्रतिक्रिया द्या