‘विश्वविक्रमवीर’ भालाफेकपटू नीरज चोप्रा लष्करात

30

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

ज्युनियर ऍथलेटिक्समध्ये विश्वविक्रम नोंदवणारा भालाफेकपटू नीरज चोप्राला हिंदुस्थानी लष्कराने ज्युनियर कमिशनड् ऑफिसर म्हणून सेवेत रुजू करून घेतले आहे. सेनादलाच्या सेवेत आल्याने आता आपल्याला मैदानावरील कामगिरी आणि व कुटुंबीयांवरही लक्ष देता येईल. अशी आनंदी प्रतिक्रिया नीरजने व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी पोलंडमध्ये झालेल्या २० वर्षांखालील जागतिक ज्युनियर ऍथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने ८६.४८ मीटर्स अंतरावर भाला फेकत नव्या विश्वविक्रमाची नोंद केली होती. विशेष म्हणजे नीरजची ही कामगिरी रियो ऑलिम्पिकमधील कास्यपदक खेळाडूंपेक्षा (८५.३८ मीटर्स) सरस आहे.

आपली प्रतिक्रिया द्या