‘आम्रपाली’ ते ‘अनारकली’, जया प्रदांनी अश्लील टीका करणाऱ्या खान पिता-पुत्रांना झापले

21

सामना ऑनलाईन । लखनौ

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यानंतर आता त्यांचे सुपुत्र अब्दुल्ला आझम यांनी भाजपच्या रामपूर येथील उमेदवार जया प्रदा यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. रामपूरमध्ये प्रचारसभेदरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या खान पिता-पुत्रांना जया प्रदा यांनी झापले आहे. ‘जसा बाप, तसाच मुलगा’, असे म्हणत जयाप्रदा यांनी दोघांवर कडाडून टीका केली. या वक्तव्यावरून समाजातील महिलांकडे हे कोणत्या नजरेने पाहात असली हे दिसून येत असल्याचे, जयाप्रदा म्हणाल्या.

आझम खान यांची जया प्रदांवर अश्लील शब्दात टीका

अब्दुल्लाच्या वक्तव्याचा समाजार घेताना जया प्रदा म्हणाल्या की, या वक्तव्यावर हसावे की रडावे हेच कळेनासे झाले आहे. मुलगा पक्का बापावर गेला आहे. उच्चशिक्षित अब्दुल्लाकडून अशी अपेक्षा नव्हती असेही त्या म्हणाल्या. तसेच तुझे वडील मला आम्रपाली म्हणतात आणि तू अनारकली म्हणतो, यावरून समाजातील महिलांकडे तुम्ही कोणत्या नजरेने पाहता हे दिसते, असेही त्या म्हणाल्या.

“त्याला हरवूनच मी काय आहे ते दाखवून देईन”, जया प्रदा यांचे आझम खान यांना…

याआधी रविवारी रामपूरमध्ये एका सभेला संबोधित करताना अब्दुल्ला यांनी जया प्रदा यांचे नाव न घेता वादग्रस्त वक्तव्य केले होते. आम्हाला अली आणि बजरंगबलीची आवश्यकता नाही, तर अनारकलीची आहे, असे अब्दुल्ला म्हणाला होता. याआधी आझम खान यांनी जया प्रदा यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर अश्लील शब्दात टीका केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या