गोरेगाव पूर्व येथील रेल्वे स्थानक रिंग रोडला भारत को ऑपरेटिक्ह बँकेचे माजी चेअरमन दिवंगत जया सुवर्णा यांचे नाव देण्यात आले आहे. बिल्लाका समाजासह सर्व समाजासाठी उल्लेखनीय कार्य केल्यामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी रिंग रोडला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कतीने जया सुवर्णा यांचे नाव देण्यात आले आहे.
दिवंगत जया सुवर्णा यांच्या जन्म 15 मे 1946 रोजी राज्य कर्नाटक येथे झाला. जया सुवर्णा यांनी बिल्लाका समाजाला वरच्या जातीकडून दिली जाणारी दुय्यम कागणूक सहन न झाल्याने समाजाच्या जडणघडणीसाठी संघटना स्थापून काम सुरू केले. बिल्लाका समाजाच्या प्रगतीसाठी शाळा बांधल्या, समाज एकत्रित होण्यासाठी मंदिरे उभारली. सद्य स्थितीला राष्ट्रीय बिल्लाका महामंडळाद्वारे सुमारे 270 बिल्लाका भकनाचे निर्माण झाले असून याचा फायदा समाजातील सर्क घटकांना होत असल्याचे दिसत आहे. समाजासाठी करीत असलेले काम पाहून 1990 साली जया सुवर्णा यांची सर्वानुमते, फक्त पाच शाखा असलेल्या भारत कॉ. बँक च्या अध्यक्ष पदी निवड झाली. जया सुवर्णा यांनी आपली व्यावसायिक अनुभव व समाजातील पत वापरून ध्येय धोरणे आखली जेणे करूनअगदी अल्प वेळातच बँकची भरभराट होऊन आज घडीला 106 पेक्षा जास्त शाखा आहेत. एक यशस्की बँकर अशी ओळख निर्माण केलेल्या जया सुकर्णा यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून 2014 साली कर्नाटक भूषण या कर्नाटक राज्याच्या सर्केच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर, खासदार गोपाळ शेट्टी, मुख्य प्रतोद शिवसेना किधिमंडळ पक्ष, आमदार सुनील प्रभू, स्थापत्य समिती (उपनगर) अध्यक्ष स्वप्नील टेंभवलकर नगरसेविका साधना माने, जया सुवर्णा यांचे कुटुंबिय उपस्थित होते.