मलाही मुख्यमंत्री व्हावंस वाटतंय!

jayant-patil

राजकारण म्हटलं की काही ना काही मोठं पद मिळण्याची महत्त्वाकांक्षा असतेच. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ‘मलाही राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल,’ असे म्हणत आपल्या मनातील सुप्त इच्छा व्यक्त केली. पण सध्याचे संख्याबळ लक्षात घेता ते शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सांगलीतील एका यू टय़ूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये जयंत पाटील यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर पाटील यांनी दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र सध्या आमच्या पक्षाकडे हे पद नाही, असे सांगत आपली इच्छा बोलून दाखवली.

अजित पवारांचा पाठिंबा

जयंत पाटील यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असेल तर मी पाठिंबा देतो असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटील यांच्या इच्छेला दुजोरा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात या विषयावर आणखी राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या