महाराष्ट्रात राजस्थानची पुनरावृत्ती अशक्य

1545

राजस्थानच्या राजकीय वर्तुळात सध्या जे घडतंय त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात अशक्य आहे. महाविकास आघाडीचा एकही आमदार फुटणार नाही आणि फुटला तर तीन पक्षाच्या ताकदीसमोर तो पुन्हा निवडून येणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील महाविकास आघाडीच सरकार भक्कम आहे. आघाडीतील तिन्ही पक्ष एकदिलानं काम करत आहेत. त्यामुळे आमदार फुटण्याचा प्रश्नच येत नाही. आघाडीचाच काय? भाजपच्या आमदाराने राजीनामा दिला आणि परत तो उभा राहिला तरीही आमच्या तीन्ही पक्षांच्या ताकदीसमोर तो निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे आघाडीतून फुटून कोणताही आमदार राजकीय विजनवासात जाण्याच धाडस करणार नाही, असे जयंत पाटील म्हणाले.

भाजप स्वतंत्र लढल्यास ६०-६५ जागाच

राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसने स्वतंत्र लढावे, असे आव्हान भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. त्याचा समाचार घेताना जयंत पाटील यांनी भाजपने स्वतंत्र लढून बघाव. भाजप स्वतंत्र लढल्यास त्यांना ६०-६५ जागांवरच समाधान मानावे लागेल. त्यापेक्षा जास्त जागा मिळूच शकत नाही, असा टोला लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या