‘बिस्लेरी’च्या सीईओपदी जयंती चौहान

टाटा कंज्युमर प्रॉडक्ट्ससोबतची डील फिस्कटल्यानंतर ‘बिस्लेरी’ला आता नवीन बॉस मिळाला आहे. बिस्लेरीची धुरा आता जयंती चौहान सांभाळणार आहेत. जयंती या बिस्लेरीचे अध्यक्ष रमेश चौहान यांच्या कन्या असून सध्या त्या पंपनीच्या उपाध्यक्षा आहेत.

वयाच्या 24व्या वर्षी जयंती चौहान बिस्लेरीच्या दिल्ली कार्यालयात रुजू झाल्या होत्या. सुरुवातीच्या काळात त्यांनी बिस्लेरीच्या प्लांटचे नूतनीकरण आणि प्रक्रिया ऑटोमेशनवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी कंपनीच्या एचआर तसेच विक्री आणि विपणन टीममध्ये महत्त्वपूर्ण बदल केले. बिस्लेरीचे नवीन ब्रँड चालवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.