कोरोनाग्रस्त महिलेचा डॉक्टरने केला विनयभंग, विलगीकरण कक्षातील धक्कादायक प्रकार

1112
molestation-1

कोरोनाची लागण झालेल्या एका 20 वर्षांच्या महिलेने तिचा विनयभंग झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. विलगीकरण कक्षातच आपल्यासोबत हा प्रकार झाल्याचा आरोपही तिने केला आहे. नोएडामधील जेपी रुग्णालयामध्ये एका डॉक्टरने आपल्यासोबत हा गैरप्रकार केल्याचे या महिलेने म्हटल्याने खळबळ उडाली आहे. हा डॉक्टर फुफ्फुसाशी संबंधित आजारावर उपचार करणाऱ्या डॉक्टर असल्याचे कळाले आहे.

ही महिला 21 जुलै रोजी विलगीकरण कक्षात दाखल झाली होती. त्याआधी तिला बेड मिळवण्यासाठी काही रुग्णालयांच्या फेऱ्या माराव्या लागल्या होत्या. ज्या वॉर्डात या महिलेला ठेवण्यात आलं होतं तो वॉर्ड दोन रुग्णांसाठीचा होता. 23 जुलै रोजी डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याने या कक्षात आणण्यात आलं होतं. आल्या दिवसापासून या डॉक्टरने महिलेसमोर शायनिंग मारायला सुरूवात केली होती. आपल्या अनेक रुग्णालयात ओळखी आहेत, माझे मोठमोठ्या लोकांशी कॉन्टॅक्ट आहेत असं तो या महिलेला सतत सांगत असायचा. आपल्याला एक मुलगीही आहे असं सांगून तिने या महिलेला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला.

दोन दिवसांपूर्वी पीडित महिला वॉर्डमध्ये 40 मिनिटे चालली होती. यामुळे ती प्रचंड दमली होती. महिलेच्या छातीमध्ये गाठ झाली आहे का हे तपासण्याची या डॉक्टरने परवानगी मागितली होती. त्याने तिचे पाय देखील दाबले होते. ज्या दिवशी महिला बरी होऊन घरी जाणार होती त्या दिवशी देखील डॉक्टरने तिचा कोरोना बरा झालाय का हे तपासतो असं म्हटलं. हा प्रकार अयोग्य असल्याचा संशय आल्याने महिलेने तिच्या एका डॉक्टर नातेवाईकाला फोन करून कोरोनाग्रस्तांची अशा पद्धतीने तपासणी करतात का असा प्रश्न विचारला. यावर नातेवाईकाने याची काहीच गरज नसते असं या महिलेला उत्तर दिलं. यानंतर महिलेला कळालं की डॉक्टरने आपला गैरफायदा घेत विनयभंग केला आहे. यामुळे तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.

आपली प्रतिक्रिया द्या