जयसिंगपूर- ऊसतोड मजुरांची वाहतूक करण्याप्रकरणी घोडावत गूळ कारखान्यावर संचारबंदीचा गुन्हा

बंदी आदेशाचे उल्लंघन करून ऊसतोड मजुरांची वाहतूक केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी चिपरी (ता. शिरोळ) येथील घोडावत फूड्स इंटरनॅशनलच्या गूळ व खांडसरी विभागाच्या कार्यकारी संचालकांसह सहाजणांवर गुन्हा नोंद केला आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांनी दिली.

कार्यकारी संचालक सुनील शहा (रा. चिपरी), टोळी मुकादम दत्ता लिंबाजी कसबे (वय 40, रा. लुखेगाव,जि. बीड), वाहतूक कंत्राटदार रावसाब देऊ कागे (वय 55, रा. नेज, जि. बेळगाव), फिल्डमन कुमार कुमटोळे (वय 62), विकास सुकुमार बरगाले (वय 38), अमोल रायगोंडा पाटील (वय 34, तिघेही रा. अब्दुललाट, ता. शिरोळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये, यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. असे असताना या आदेशाचे उल्लंघन करून बोलेरो पिकअपमधून बेकायदा प्रवासी वाहतूक करण्यात आली. अंकली टोल नाक्याजवळ रविवारी रात्री उशिरा अंकली टोलनाक्याजवळ हे सर्वजण सापडल्याने पोलिस नाईक बाळासाहेब चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या